परिचय
मोखाडा तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून मोखाडा तालुक्याचे ठिकाण 90कि.मि.अंतरावर आहे. या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-यांचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 47308.42 हेक्टर आहे.त्यापैकी 7000 हेक्टर भात पिकासाठी असून नागली 4900 हेक्टर, वरई 4300 हेक्टर,कडधान्य-2403 हेक्टर व गळीतधान्य-843 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यातील सरासरी 2500 ते 3000 मी.मी.इतके पर्जन्यमान आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार मोखाडा तालुक्याची लोकसंख्या 83,453 इतकी आहे. त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या 73,180 व शहरी (नगरपरिषद-मोखाडा)लोकसंख्या 10273 इतकी आहे. त्यामध्ये पुरुष 41691 व स्त्रिया 41762 एवढी आहे. अनुसूचित जमाती ग्रामीण लोकसंख्या 69164 व शहरी नगरपंचायत लोकसंख्या 7678 व अनुसूचित जाती ग्रामीण लोकसंख्या 1447 , शहरी नगरपंचायत लोकसंख्या 175 व इतर ग्रामीण लोकसंख्या 2569 आणि शहरी नगरपंचायत लोकसंख्या 2420 इतकी आहे