वाशाळा लेणी
महाराष्ट्राला लाभलेल्या थोर सांस्कृतीक वारसामध्ये तीन प्रकारच्या वास्तू हे ठळकपणे नजरेत भरतातलेणी,मंदिरे, आणि किल्ले.
महाराष्ट्रात लेणी खोदण्याचा इतिहास तसा दुसरे शतकं ते दहाव्या शतकापर्यंतचा आहे. त्यापैकी ही एक वाशाळा लेणी.
वाशाळा गावातील आणि पंचक्रोशीतील माणसे लेणीला वसई म्हणतात. काळाच्या पडद्याआड अशा शेकडो अपरीचित लेण्या ह्या सह्याद्रीच्या कुशीत समावलेल्या आहे. त्यापैकी ही एक लेणी. या लेणी खूप सुंदर आहे. गावाला लागूनच डोंगराच्या पायथ्याशी ही प्राचीन लेणी. जाणकार व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार ही लेणी अर्धवट आहेत …पण सुरुवात अप्रतिम केलेली दिसते.दुमजली लेणं करण्याची जी पद्धत तीच इथे वापरणार होते, येथे आपण बघितल्यनंतर अस लक्षात येते की येथे तळ मजला आणि पहिला मजला अशी रचना दिसते. जिन्याच काम पण अर्धवट राहिले आहे.हे जैन लेणं आहे. आत मध्ये दोन जैन तिर्थंकरांच्या खड्गासनातील मूर्ती म्हणजे प्रतिमा उभ्या स्वरुपात आहे. जैन धर्मात एकुण चोवीस तिर्थंकार आहेत व त्यातील दोन तीर्थकरांच्या मूर्ती असाव्यात दोन्हीही सारख्या असल्यामुळे मूर्ती नेमकी कुणाची असावी हे ओळखणे थोडे कठीण जाते.
सुरुवातीस दोन पायऱ्या आहेत त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते मध्ये चौथरा केला असून बाजूलाच पाण्याचे कुंड खोदलेले आहे. त्यालाच लागून खडकात एक शंकराची छोटीसी पिंड कोरलेली आढळुन येते. आत्ता ही पिंड येथे का तयार केली असावी हे माहिती नाही. छोटेसे दर्शनी मंडप.दर्शनी भागात सुंदर दोन खांब उभे आहे.खांब अखंड नाहीत. व पाणी बाहेर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या दोन नळ्या आहेत .त्या नंतर मुख्य दरवाजावर काहीतर कोरल आहेत पण स्पष्ट दिसत नाही. तेथून आत गेले की १०बाय१५ ची गुफा आहे.आवाज खुपच घुमतो.समोरच्या बाजूस दोन जैन मूर्ती प्रतिमा खडकावर कोरलेल्या आहेत.व कप्पे आहेत यात स्थल मूर्ती असावी. (स्थल मूर्ती म्हणजे एका जागेवरून दुसर्याा जागेवर हलवू शकतो ) दोन तीन शिल्पे तुटलेल्या अवस्थेत आहेत.एक शिवलिंग आहे हे नंतर ठेवला असेल .चारही कोपऱ्यात दिवे लावण्यासाठी जागा आहे. काम अर्धवट राहिल्याच्या अनेक खुणा इथे दिसतात. अर्धवट काम का सोडले या बाबत कुणालाच काही कल्पना नाही.
या लेणी ची निर्मिती का केली असावी?
स्थानिकांच्या मते नाशिक भागात अंकाई, टकाई, इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर या भागात त्याकाळी जैन धर्मास अनकुल वातावरण होते.त्या काळात जैन लेणी व मंदिरे याची निर्मिती या भागात मोठ्या प्रमाणात झालेली आढळून येतात. त्रिंगलवाडी,त्र्यंबकेश्वर जैन लेणी ,मंदिरे याचेच पुरावे देतात. त्याच काळात ही लेणी कोरली असावी. लेण्यांच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलली गोष्ट अशी की पुरातन काळी जैन तीर्थकार धर्म प्रसारासाठी फिरत असत त्यांचा दिनचर्या पाळायचा नियम कडक असावा. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धर्म प्रसारासाठी फिरणाऱ्या तीर्थकार यांना ध्यानधारणा सहज करता यावी यासाठी अशा लेणी कोरून घेत असात. सातवाहन काळानंतर परदेशी व्यापाराशी होणाऱ्या व्यापाराला आलेले भरभराटी ही लेणी महत्वाची ठरली.