योजनेचा प्रकार | आदिवासी आणि ग्रामीण भागातील गंभीर आजाराने ग्रस्त मुलांना शस्त्रक्रियेसाठी मदत करणे. |
योजनेचा उद्देश | आदिवासी आणि ग्रामीण भागातील गंभीर आजाराने ग्रस्त मुलांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | गंभीर आजाराने ग्रस्त असून शस्त्रक्रिया करणाऱ्या 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना. |
लाभाचा स्वरूप | शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक लाभार्थीला जास्तीत जास्त ₹50,000/- आर्थिक मदत, शासन निधीशिवाय, संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल. |
पात्रता निकष | गंभीर आजाराने ग्रस्त असून शस्त्रक्रिया करणाऱ्या 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना. |
आवश्यक कागदपत्रे | पूर्ण भरलेला अर्ज फॉर्म, आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र (गंभीर आजार व शस्त्रक्रियेबाबत), आधार कार्ड, स्थानिक रहिवासी पुरावा (उदा. रेशन कार्ड), गरीबी रेषा नंबर व प्रमाणपत्र किंवा तहसिलदाराचे जन्म प्रमाणपत्र, आदिवासी क्षेत्र असल्यास ग्रामसभा ठरावाची प्रती, बँक पासबुकची प्रती. |
कार्यरत कार्यालय व पूर्ण पत्ता | 005, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद पालघर, ग्राउंड फ्लोर, नवीन प्रशासकीय इमारत, कोलगांव, पालघर (W) |
अटी व शर्ती | गंभीर आजाराने ग्रस्त असून शस्त्रक्रिया करणाऱ्या 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना. |
अर्ज करण्याची पद्धत | पूर्ण भरलेला अर्ज फॉर्म आंगणवाडी सेवकाद्वारे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करणे, जिल्हा पातळीवर सर्व अर्ज बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गोळा करून महिला व बालकल्याण समितीकडून मंजुरीसाठी सादर करणे. |