योजना सुरूवात :- ३ मे २००३ (सन २०२१-२२ पासून या योजनेची अंमलबजावणी धार्मिक अल्पसंख्याक समाजातील ९वी ते १२वीतील मुलींसाठी योजनांच्या संचालनालयामार्फत करण्यात येत आहे).
क्षेत्र :- शासनमान्य व्यवस्थापनाखालील अनुदानित/बिनअनुदानित/स्वयं वित्तपुरवठा शाळांमधील ९वी ते १२वीत शिकणाऱ्या पात्र अल्पसंख्याक विद्यार्थिनी.
लाभार्थी :- ९वी ते १२वीत शिकणाऱ्या सर्व अल्पसंख्याक समाजातील मुली.
लाभ :-
- ९वी व १०वीतील विद्यार्थिनींना वार्षिक रु. ५,०००/-
- ११वी व १२वीतील विद्यार्थिनींना वार्षिक रु. ६,०००/-
अर्ज कसा करावा :- या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय शासनाच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून केली जाते.
संपर्क :- योजनेबाबत अधिक माहितीसाठी शिक्षण अधिकारी (योजना) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.