मोखाडा तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून मोखाडा तालुक्याचे ठिकाण 90कि.मि.अंतरावर आहे. या तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-यांचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 47308.42 हेक्टर आहे.त्यापैकी 7000 हेक्टर भात पिकासाठी असून नागली 4900 हेक्टर, वरई 4300 हेक्टर,कडधान्य-2403 हेक्टर व गळीतधान्य-843 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यातील सरासरी 2500 ते 3000 मी.मी.इतके पर्जन्यमान आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार मोखाडा तालुक्याची लोकसंख्या 83,453 इतकी आहे. त्यापैकी ग्रामीण लोकसंख्या 73,180 व शहरी (नगरपरिषद-मोखाडा)लोकसंख्या 10273 इतकी आहे. त्यामध्ये पुरुष 41691 व स्त्रिया 41762 एवढी आहे. अनुसूचित जमाती ग्रामीण लोकसंख्या 69164 व शहरी नगरपंचायत लोकसंख्या 7678 व अनुसूचित जाती ग्रामीण लोकसंख्या 1447 , शहरी नगरपंचायत लोकसंख्या 175 व इतर ग्रामीण लोकसंख्या 2569 आणि शहरी नगरपंचायत लोकसंख्या 2420 इतकी आहे. तालुक्याचे ठिकाण मोखाडा असून ते समुद्र सपाटी पासून 1600 फुट उंचावर वसलेले आहे. या तालुक्यात 27 ग्रामपंचायती असून त्यामध्ये 56 महसुल गावे आहेत. मोखाडा अंतर्गत जिल्हा परिषद गट 03 व पंचायत समिती निर्वाचण गण 06 आहेत. मोखाडा तालुक्याच्या पुर्वेस नासिक जिल्हा असून लगत त्रिंबकेश्वर नगरपंचायत आहे. मोखाडा तालुक्याच्या पश्चिमेला जव्हार तालुका, दक्षिणेला वाडा तालुका,व उत्तरेस नासिक जिल्हा व गुजरात राज्याची सीमा आहे. या तालूक्यात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तिन्हीही ऋतु प्रकर्षाने जाणवतात. या तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ व द-याखो-यांचा असल्याने या ठिकाणी भात,नागली,वरई ही प्रमुख पिके घेण्यात येत असून त्याच बरोबरतुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिकेही घेतली जातात. तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लागवड,फुलशेती, वांगी,मिरची,टोमॅटो,काजू,आंबा,तुती व अलीकडे स्टॉबेरीची ही लागवड केली जाते. तालुक्यामध्ये खोच, पळसपाडा, मध्यवैतरणा धरणे आहेत. या तालुक्यातमोखाडा येथे रंगपंचमीला बोहाडा उत्सव व देवबांध येथे यात्रा भरवली जाते. मोखाडा तालुक्यामध्ये देवबांध येथे प्राचीन गणेश मंदिर, हनुमान मंदिर मोखाडा, विठठल मंदिर मोखाडा, शाईबाबा मंदिर मोखाडा, जगदंबामाता मंदिर मोखाडा व प्राचीन शिव मंदिर ओसरविरा ही देवस्थाने आहेत. तसेच ऐतिहासिक स्थळे वाशाळा येथे पांडवलेणी व सुर्यमाळ येथे निसर्गोपचार केंद्र आहे. या तालुक्यामध्ये वारली, कोकणा, कातकरी, ढोरकोळी, क.ठाकुर, म.ठाकुर व महादेव कोळी हया आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणावर आहे.
परिचय
विभाग | माहिती |
---|---|
एकुण गटाचे क्षेत्रफळ:- | 47308.42 हे |
गटाची लोकसंख्या:- | 73180 |
जिल्हा परिषद गट:- | 3 |
पंचायत समिती गण:- | 6 |
अनुसुचित जमाती लोकसंख्या:- | 69164 |
अनुसुचित जाती:- | 1447 |
इतर लोकसंख्या:- | 2569 |
गटातील एकूण ग्रामपंचायत:- | 27 |
गटातील एकुण महसुली गावे:- | 56 |
गटातील एकुण पाड्यांची संख्या:- | 157 |
स्वतंत्र ग्रामपंचायत संख्या:- | 16 |
ग्रुप ग्रामपंचायत संख्या:- | 11 |
पशुवैदयकीय दवाखाने श्रेणी 1:- | 1 |
एकुण जि.प. शाळांची संख्या:- | 154 |
शासकिय आश्रम शाळा:- | 7 |
प्राथमिक आरोग्य केंद्रे:- | 4 |
आरोग्य उपकेंद्र:- | 20 |
अंगणवाडी केंद्र संख्या:- | 208 |