राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय देहरादून शिष्यवृत्ती (RIMC) (खाते क्रमांक – 22021198)

योजना सुरूवात :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत एस.एन. दिनांक २५.०७.२०१७ अन्वये जानेवारी २०१७ पासून आयोजित.

क्षेत्र :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय, देहरादून प्रवेश परीक्षा दरवर्षी दोन सत्रांमध्ये (जून व डिसेंबर) घेतली जाते.

लाभार्थी :-

  • या परीक्षेत पात्र ठरलेला विद्यार्थी.
  • शासनमान्य शाळेत ७वी शिकणारा किंवा ७वी उत्तीर्ण विद्यार्थी.
  • प्रवेशाच्या तारखेप्रमाणे (१ जानेवारी) विद्यार्थ्याचे वय ११.५ वर्षांपेक्षा कमी नसावे व १३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • परीक्षार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

लाभ :-
या योजनेअंतर्गत दरवर्षी दोन्ही सत्रांमधून एकूण ४ विद्यार्थी निवडले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ८वी ते १२वीपर्यंत पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते.

संपर्क :- योजनेबाबत अधिक माहितीसाठी शिक्षण अधिकारी (योजना) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.