क्षेत्र :- शासनमान्य सर्व अनुदानित शाळा.
लाभार्थी :- ९वी व १०वीतील दिव्यांग विद्यार्थी, मात्र विद्यार्थ्याचा अपंगत्वाचा टक्का ४०% पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
लाभ :- अपंगत्वाच्या प्रकारानुसार शासनाकडून वार्षिक रु. २,०००/- ते रु. ४,०००/- इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते.
अर्ज कसा करावा :- या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय शासनाच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून केली जाते.
संपर्क :- योजनेबाबत अधिक माहितीसाठी शिक्षण अधिकारी (योजना) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.