संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा भारत सरकार शिष्यवृत्ती योजना (खाते क्रमांक – 22021062)

योजना सुरूवात :- २० ऑक्टोबर १९९८ च्या अधिनियमांतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येते.

क्षेत्र :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत संस्कृत भाषेची गुणवत्ताधारित शिष्यवृत्ती दिली जाते.

लाभार्थी :- या परीक्षेत ८वी व १०वी तसेच १०वीच्या संस्कृत विषयातील गुणवत्तेनुसार ११वी व १२वीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

लाभ :- ९वी व १०वीसाठी एकूण १० महिन्यांसाठी शिष्यवृत्ती मिळते आणि ११वी व १२वीसाठी प्रतिमहिना रु. १२५/- इतकी शिष्यवृत्ती मिळते.

संपर्क :- योजनेबाबत अधिक माहितीसाठी शिक्षण अधिकारी (योजना) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.